Sunday, 30 June 2024

PM Poshan 2024-25 New Update - प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत महिन्यातून एकदा स्नेहभोजन उपक्रम!

  प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्नेहभोजन उपक्रम राबविण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिनांक 29 जून 2024 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थितीत वाढ व कुपोषण मुक्तता करण्यासाठी राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत. कोणत्याही योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी योजनेमध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. योजनेत वैविधता, नाविन्यता आणण्यासाठी व समाजाचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने विशेष दिनाचे औचित्य साधुन विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत चांगला आहार देण्याचा उपक्रम लोकसहभागातून राबविणे आवश्यक आहे.

   भारत सरकारच्या "१०० दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्नेह भोजनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. नियमित मध्यान्ह भोजना व्यतिरिक्त स्नेहभोजनातील लोकसहभागामुळे शिक्षण क्षेत्रात समाजाचा सहभाग वाढेल, विद्यार्थी उपस्थिती वाढण्यास मदत होईल. तसेच, विद्यार्थ्यांच्या वाढीस उपयोगी असणारी पूरक पोषण मूल्ये प्राप्त होतील. आहाराची पौष्टिकता वाढण्यास मदत होईल, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण अन्न पदार्थाची चव चाखता येईल, तसेच सामाजिक बंधुता, एकतेची भावना, सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होईल. या अनुषंगाने प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेत लोकसहभाग वाढविण्यासाठी "स्नेहभोजन" उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्याचे निर्देश देण्यात येत आहेत

१ . नवीन शैक्षणिक वर्षातील पुढील तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये किमान एक दिवस शाळेमध्ये स्नेह भोजन उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात यावी.

२. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरविण्यासाठी "स्नेहभोजन" हा उपक्रम राबविण्यात यावा, सदर उपक्रम "ऐच्छिक" स्वरूपाचा राहील.

३. शाळास्तरावर "स्नेहभोजन" उपक्रमाची अंमलबजावणी खालीलप्रमाणे करण्यात यावी.

     गावातील व्यक्तींचे वाढदिवस, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, जन्म शताब्दी इ. तसेच, लग्न समारंभ, धार्मीक सप्ताह, निरोप समारंभ, राष्ट्रीय सण, स्थानिक पातळीवरील सण इ. बाबी या उपक्रमातंर्गत विशेष दिनाच्या औचित्यामध्ये समाविष्ट राहतील.

     योजनेस पात्र सर्व शाळामधून" स्नेहभोजन उपक्रमाचे आयोजन शाळेने करावे. त्यासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षात शाळेने वर्षभराचे नियोजन करावे. यामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस राहतील, त्यासाठी ग्रामसभा, शालेय व्यवस्थापन समितीची सभा, पालक समेद्वारा जनजागृती करण्यात यावी, तसेच ग्राम पंचायत कार्यालयातील कर्मचारी अधिकारी तसेच सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनाही सदर प्रक्रियेबाबत अवगत करुन त्यांना सदर प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घ्यावे.

     शालेय पोषण आहारासोबत मिठाई, जेवण किंवा पूरक पोषक आहार (उदा. मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते, मनुका, आक्रोड, बेदाणे) फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टांन्त्र) इत्यादीचा समावेश असलेले अन्न / आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा.

"स्नेहभोजन" उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेस भोजन देण्यात यावे व भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करणार आहे याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तिनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा.

कार्यालयातील कर्मचारी अधिकारी तसेच सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनाही सदर प्रक्रियेबाबत्त अवगत करुन त्यांना सदर प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घ्यावे.

ii) शालेय पोषण आहारासोबत मिठाई, जेवण किंवा पूरक पोषक आहार (उदा. मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते, मनुका, आक्रोड, बेदाणे) फळे, शिजविलेले पदार्थ, मिष्टांन्न) इत्यादीचा समावेश असलेले अन्न / आहार विद्यार्थ्यांना देण्यात यावा.

iv) "स्नेहभोजन" उपक्रमांतर्गत कोणत्या तारखेस भोजन देण्यात यावे व भोजनात कोणत्या पदार्थाचा समावेश करणार आहे याबाबत संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीने व देणाऱ्या व्यक्तिनी परस्पर सहमतीने एकत्रित निर्णय घ्यावा.

V "स्नेहभोजन" उपक्रमाअंतर्गत शाळांना रोख रक्कम न देता खाद्य पदार्थ किंवा आवश्यक इतर साहित्य (पाणी पिण्याचे पिंप, पाण्याचे ग्लास, ताटे, चमचे, डिश, मुलांना बसण्यासाठी चटई अथवा सतरंजी, पाण्याची टाकी, पाणी शुध्दीकरण यंत्र इ.) देता येतील.

vi खाद्य पदार्थ ताजे व पौष्टिक असावे, तांदूळ /गहू/नाचणी, शेवगा शेंग/डाळी सोबत हिरव्या पालेभाज्या दिल्या जाव्यात, बाजारातील वेष्टनबध्द पदार्थ (जंक फूड) तसेच उघड्यावरील आणि शिळे अन्नपदार्थ विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नयेत, यासोबतच जंक फूडच्या हानिकारक प्रभावांबद्दल विद्यार्थी आणि पालक तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी.

vii) खाद्य पदार्थाचे विद्यार्थ्यांना वितरण करताना वितरकाने शाळेत उपस्थित रहावे.

viii) खाद्य पदार्थ विद्यार्थ्यांना शाळेमध्येच तसेच, मध्यान्ह भोजनाच्या वेळेतच देण्यात यावेत.

ix) यामध्ये वितरकाने जेवण दिल्यास त्या दिवशी शालेय पोषण आहार शिजविण्यात येवू नये. तथापि, केवळ अल्पोपहार / पूरक आहार दिल्यास त्या दिवशी शाळेमध्ये शालेय पोषण आहार देणे आवश्यक राहील.

x) सदर भोजनातून अनुवित्त प्रकार घडणार नाही याची दक्षता संबंधित वितरकाने घेणे आवश्यक आहे. यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वितरकाची राहील.

xi) "स्नेहभोजन" उपक्रमामुळे शाळेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

xii) शालेय पोषण आहार ही विदयार्थी केंद्रीत योजना असून अतिशय संवेदनशील असल्यामुळे सदर उपक्रम राबविताना दक्षता घेणे आवश्यक आहे. वितरक / समूहास याची कल्पना देणे आवश्यक आहे.

४. "स्नेहभोजन" उपक्रमास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर सभा व बैठकीमध्ये प्रसिध्दी देण्यात यावी.

दैनिक वृत्तपत्रातून व प्रसार माध्यमातून याबाबत प्रचार करुन सामाजिक बांधिलकी व समाजाचा सहभाग वाढविण्याबाबत प्रचार करण्यात यावा, ग्राम सभा/ पालक सभा / स्थानिक पातळीवरील सण, समारंभ (हळदी कंकु / गणेशोत्सव / नवरात्र / दहीहंडी) मधुन सदर योजनेस प्रसिध्दी देवुन लोकसहभाग वाढविण्यात यावा.

५ . नवीन शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ पासून वरील प्रमाणे सर्व शाळांमधून स्नेहभोजन योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी होईल याकरीता आवश्यक ते नियोजन करण्यात यावे.

६. जेथे "स्नेहभोजन" उपक्रम राबविला जाईल तेथील क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी या पत्रासोबत जोडलेल्या (परिशिष्ट-अ) मध्ये सदर उपक्रमाबाबतची माहिती तालुक्यांमार्फत संकलित करुन जिल्ह्याची एकत्रित माहिती संचालनालयास प्रत्येक महिन्यानंतर सादर करावी.



RMIRZA.......



Saturday, 29 June 2024

UDISE PLUS SDMS New Update - Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणे बाबत MPSP. DROP BOX मधील विद्यार्थी Import कसे करावे?

 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई च्या दिनांक 29 जून 2024 च्या नवीन परिपत्रकानुसार प्रकल्प संचालकांनी यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी शाळांमध्ये Import करून घेणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 

सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने भारत सरकारकडून यु-डायस प्लस प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

दि. २८ जून, २०२४ रोजीच्या यु-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये २३,४७,३८६ एवढे विद्यार्थी Dropbox मधुन शाळांमध्ये Import करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. यावर्षी यु-डायस प्लसमध्ये कोणत्याही शाळेस इयत्ता २री ते इयत्ता १२वी पर्यंतच्या वर्गामध्ये New Entry करता येणार नाही. विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईन पध्दतीने माहिती Transfer करून दुसऱ्या शाळांमध्ये प्रवेश नोंदविता येईल.

SDMS पोर्टल

1. जी मुले pramotion करताना चुकून आपल्याच शाळेत pramote झालेली आहेत..2

. जी मुले शाळा सुरू असताना TC घेऊन गेलेली आहेत..

अशा मुलांसाठी सूचना..👇🏼

Transfer Certificate module चा वापर करून Dropbox मध्ये पाठवावे..

जेणेकरून समोरील शाळेला त्यांच्या शाळेमध्ये import करता येतील..
SDMS पोर्टल लिंक


https://sdms.udiseplus.gov.in/api/v1/login

UDISE PLUS --D

ROP BOX मधील विद्यार्थी Import कसे करावे?


Udise plus SDMS Portal - School लॉगिन केल्यानंतर Progression Module वर क्लिक करा 

Import module वर क्लिक करा

Get National code वर क्लिक करा

Aadhar No. Type करा

Date of Birth 

(आधार कार्ड वरील किंवा शाळेतील )( Date of Birth पोर्टल वरील calender मधून select करा) (जन्म तारीख चुकीची दाखवत असेल तर सन 2022-23च्या student लिस्ट मध्ये जाऊन जन्म तारीख खात्री करून घ्या किंवा पालकांनी आधार कार्ड वरील जन्मतारीख update केले आहे का तपासून घ्या)

Go वर click करा

येणाऱ्या page वर 

Class select करा

Division select करा

Admission Date type करा

IMPORT वर क्लिक करा

Page refresh करा किंवा logout करून लॉगिन करून पहा.. 

विद्यार्थी student लिस्ट

 मध्ये आलेला असेल. ...

Thank you...

Rmirza...



Friday, 28 June 2024

उच्च शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास मिळेल भोजन निवास व निर्वाह भत्ता ऑनलाईन अर्ज लिंक व माहिती.

 स्वयम् योजनेच्या धर्तीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना.


उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना भोजन, निवास, निर्वाह भत्ता.


काय आहे पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना?


आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात राहण्याचा तसेच भोजनासाठी लागणारा खर्च परवडण्यासारखा नसतो व परिणामी बहुतांश युवक हे पैशाअभावी त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना सुरू केली आहे.


अर्ज करण्यासाठी लिंक पुढील प्रमाणे.


https://swayam.mahaonline.gov.in/


https://swayam.mahaonline.gov.in/Registration/Registration



शासकीय महाविद्यालयात १२ वीनंतरच्या व्यावसायिक अभ्याक्रमासाठी प्रवेशित असलेल्या धनगर समाजातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ३० जूपर्यंत सादर करता येणार आहेत.


धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर गुणांवर आधारित पदविका शिक्षण घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेंतर्गत लाभ दिला जातो. यंदा २०२४-२५ शैक्षणिक वर्षाकरिता अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वतःच्या मोबाइलच्या साहाय्याने घरी बसून या योजनेंतर्गत अर्ज करू शकतो. ३० जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असून पात्र विद्यार्थ्यांना इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडे अर्ज सादर करावेत.




कोणाला मिळणार योजनेचा लाभ?


अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच अल्पसंख्याक व मागास वर्गातील विद्यार्थ्यांना महाविद्यालय, उच्च महाविद्यालय, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय

• आयटीआय असा अल्प मुदतीचे कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.

कागदपत्रे काय लागणार?


• या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याला जातीचा दाखला, बोनाफाइड, गत वर्षीची उत्तीर्ण असल्याची टीसी, स्वयंयोजनेचा अर्ज, पासपोर्ट फोटो.


अर्थसाहाय्य थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात.


• यासह भाडे करारनामा, बैंक पासबुक, महाविद्यालयाची हजेरी व इतर शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक


पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना समाज कल्याण विभागाकडून राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. यासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करणे अनिवार्य असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.



- गीता गुट्टे, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण

Tuesday, 25 June 2024

UDISE+ 2024-25 Student Promotion Update - यु-डायस स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी प्रमोशन कसे करावे? लिंक सविस्तर मार्गदर्शन.

 यु-डायस प्लस पोर्टलवर 2023 24 सत्र मधील विद्यार्थी पुढील वर्गात प्रमोशन करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे त्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या मोबाईलवरून देखील आपण आपला वर्ग प्रमोट करू शकतो त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

https://sdms.udiseplus.gov.in/

लिंक वर क्लिक केल्यानंतर ओपन झालेल्या विंडोमध्ये राज्य निवडून त्यासमोरील गो बटन वर क्लिक करा.

आपल्याला शाळेचे लॉगिन करण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड टाकून त्याखाली सिक्युरिटी कोड टाकल्यानंतर लॉगिन करायचे आहे लॉगिन यशस्वी झाल्यानंतर.

वरील प्रमाणे विंडो ओपन होते त्यामधील करंट अकॅडमी इयर 2024 25 वर क्लिक करा आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.

प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊन प्रोग्रेशन मॉडेलवर GO बटनावर क्लिक करावे

वर्ग आणि तुकडी निवडून GO बटनावर क्लिक करावे

नंतर आपल्याला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल यामध्ये प्रोग्रेशन स्टेटस मध्ये योग्य पर्याय निवडून व 2023-24 चे %, विद्यार्थ्यांचे शाळेतील उपस्थित दिवस, शाळेत शिकत असल्यास Study in Same School निवडावे किंवा TC दिली असल्यास ते ऑप्शन निवडावे. याप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची, ही प्रमोशनची प्रक्रीया पूर्ण करावी.

याच प्रमाणे इयत्ता 1 ली मध्ये सर्व नवीन प्रवेशित विदयार्थाना प्रवेश शाळांमध्ये दयावयाचे आहे. या नवीन प्रवेश घेणाऱ्या विदयार्थ्यांना त्यांच्या इतर कागदपत्रासोबतच विदयार्थ्यांचे आधारकार्ड बाबत विचारणा करावी. कारण सुरवातीलाच आधारकार्ड असेल तर पुढे सरल व युडायस मध्ये याची नोंद घेणे सोयीचे होईल. ज्या विदयार्थ्यांजवळ आधार नसेल त्यांना तात्काळ काढण्याच्या सूचना द्याव्यात. याच प्रमाणे शाळा सुरु होतच, विदयार्थांचे आधार पेंडिंग असल्यास ते काम तात्काळ पूर्ण करावे, कोणत्याही विदयार्थीचे आधार व्हॅलीडेशन पेंडीग राहणार नाही याची दक्षता घ्यावी.